STORYMIRROR

pavan joshi

Others

3  

pavan joshi

Others

हल्लीचं प्रेम बदललंय का?

हल्लीचं प्रेम बदललंय का?

2 mins
410


थोडे कवितेविषयी : आजच्या आणि पूर्वीच्या काळातील प्रेम करण्याचे स्वरूप बदलत चालले आहे. त्याविषयीची ही कविता.

कवितेचे नाव : हल्लीचं प्रेम बदललंय का?


लैला मजनुची प्रेमकहाणी

आता दाखल्यापुरती उरलीय का?

राहून राहून प्रश्न पडतोय

हल्लीचं प्रेम बदललंय का?

बघताबघता होते मैत्री अन

क्षणात त्या कमिटमेंट प्रेमाची

सगळे काही ठरते चटकन

नाही पुरी ओळख दोन मनांची

भांडणाच्या छोट्या निमित्ताला

पर्याय ब्रेकअपचा केव्हाही

एकट्याने पुन्हा कंठुनी दिवस

जगावे विरह गीत गाऊनी

काय होते असे अचानक

उगा येतो आठवणींचा पूर

नकळत पणे जुळतो तसा

अलगदपणे पॅचअपचा सूर


असे चक्र चालू आता या एकाशी

तुटले की पुन्हा कुणा दुसऱ्याशी

जसा ठरवून खेळ खेळतोय का

आपणच आपल्याच आपल्या मनाशी ?

नाही उरले बंधन मनाचे

नाही उरला धीर या नात्यांना

आता अगदी महिनासुद्धा

पुरतोय प्रेम जमून संपायला

नाहीत आता लेखी प्रेमपत्रं

नाही त्यातील अगतिकता

कायमच्या चॅटिंगमुळे हरवली

लिहण्या बोलण्यातली आतुरता

म्हणतात बदलला काळ आता

सगळं झालंय वेगवान खूप

तसे प्रेमानंही घेतलंय थोडं जरा

त्याचं नवं ऑनलाईन रूप

खरं प्रेम कसं करायचं

कुठे कुणी शिकवतय का?

राहून राहून प्रश्न पडतोय

हल्लीचं प्रेम बदललंय का?



Rate this content
Log in