हा मंद मंद वारा
हा मंद मंद वारा
1 min
191
हा मंद मंद वारा
शेतावरून आला
वाटे सुगंध त्याचा
फुलाहुनी हा न्यारा ।।
पाणो पाणी झाडातून
आले पक्षी हे भरूनी
वाटे किल तयाची
जशी गोड गोड गाणी।।
नदी नाले आले पाणी
वाहे दू थडी भरुनी
नाचे मोर ते बघुनी
आपले पंख पसारूनी।।
मोत्यावाणी शेतातुनी
आले कणस हे भरूनी
इंद्रधनुच्या रंगानन
झाली सपतरंगी धरणी।।
थेंब थेंब पावसाने
झाली हिरवीगार धरणी,
वाटे हिरवळ बघुनी
नटली पैठणीत धरणी।।
