Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Dr.Gangaram Dhamake

Others

3  

Dr.Gangaram Dhamake

Others

गणित आयुष्याचे

गणित आयुष्याचे

1 min
11.7K


वजा केलं त्यांना, ज्यांनी भाग केले

गुणाकार केले त्यांना, बेरजेत नेले

रेषेत नसलेले, सदा बाहेरच राहिले

बसले जे रेषेवरती, ते पुढे पुढेच गेले

आयत त्रिकोण चौरसांनी

बंदिस्त केले सारे.

अपूर्णांकांचे पूर्णत्व अपूर्णच राहिले,

चढता उतरत्या क्रमात

पहिले शेवटी आणि शेवटचे पहिले झाले,

पण मधले मात्र दोन्हीत अडकले

हाताच्याची वजाबाकी करताना

उसने किती मागावे?

बेरजेतला हातचा, फारसा उरलाच नाही

प्रमेयाची सिद्धता साधता, पायरीपायरी उतरलो

पण समिकरणाची उकल करता करता,

निम्मे अधिक पानात भरलो.

काही उदाहरणांनी डोक्याचा भुगा केला,

काही मात्र सरळ सुटत गेली.

गणितातील गंमत कधी समजली,

कधी कोडे बनून राहिली,

भूमितीच्या मापनात फुटपट्टी अपुरीच पडली.


Rate this content
Log in