गजरा
गजरा
1 min
246
दारातला मोगरा मनात कधी रुजला कळलंच नाही
तो फुलत गेला, मी बहरत गेली,
नात्याची वीण घट्ट कधी झाली कळलंच नाही....
तो शुभ्र रंग, हिरवे पर्ण, धुंद सुगंध मनात साठवून
एके दिवशी मी उंबरठा ओलांडला
मी त्याला भेटताना तो उगाचच हसला....
नव्या दारातही होता असाच एक मोगरा
गृह प्रवेश करताच सख्याने माळला केसात गजरा....
तोच रंग, तिच दरवळ कळी माझी खुलली
संसाराची सुरवात कशी सुगंधी झाली....
गजऱ्याने नेहमी आनंदी साथ दिली
त्याच्या कडे बघून मी खूप काही शिकली
नात्यांनाही गुंफलेय मी प्रेमळ धाग्यात
बरकत आहे सुखला माझ्या आयुष्यात
