गझल
गझल
1 min
189
काॅल कुठे मिसकाॅल कुठे
बॅटेवरचा बाॅल कुठे
लाईव्हच पाहू म्हटले
दिसली नाही वाॅल कुठे
लग्नाला जाऊ म्हणतो
सांगताय का हाॅल कुठे
घरभर खेळणीच सारी
सापडेच ना डाॅल कुठे
गडी बापडा तो फिरतो
मुलगी नाहीच टाॅल कुठे
आता काय शाॅपिंगचे
उघडलेत का माॅल कुठे
एवढ्यात थंडी पडली
शोधू का मी शाॅल कुठे
पावसातही मी पाही
आता वाॅटरफाॅल कुठे
