घुसमट
घुसमट
1 min
294
जीव घुसमटला गेला धुरानं
पीडित भगिनींच्या प्रेताच्या सारणांन
स्मशान तुडुंब झाली प्रेतांनी
कोंडमारा झाला प्रेतांच्या धुरानी
पुन्हा जन्माला यावं छत्रपती शिवराजेंनी
आकाश धुराने काळवंडून गेलं
साकाळलेल्या रक्ताने करपून गेल
मेघराजांनी केलं भगिणीसाठी उपोषण
थांबवा भगिनीचं लैगिंक शोषण
धरणीमाता दुभंगू लागली
लेकींवरच्या बलात्काराने दुःखी झाली
वसुंधरा ही माणसांवर कोपली
सरणाच्या झळयाने होर पळून निघाली
जननी नाहीशी होऊ लागली
मानव अंताची चाहूल लागली
