घर
घर
एक घर आज अंधारात एकटेच रडत होत..
स्वतः चं मोकळं अंगण पाहून मनातच हळहळत होत..
छोटी पावलं बागडणारी, आतबाहेर करणारी
अडखळणार नव्हती त्याच्या उंबऱ्यात..
याचेच दुःख त्याला होत होतं
एक घर आज अंधारात एकटेच... रडत होतं
कापणाऱ्या वृद्ध हातांना ज्या भिंतींनी आधार दिला
त्याच स्वतः च आज निराधारपणे उभ्या होत्या..
बंद दरवाजा उदास होता
उद्या पासून अंगण झाडले नाही जाणार
किणकिणत्या बांगड्याचा आवाज घरात कुठे च नसणार,
आशेची खिडकी ही कायमची बंद असणार..
याच सगळ्या विचाराने
काळजात त्याच्या कालवत होत..
एक घर आज अंधारात एकटेच रडत होत..
"तो "बाहेर पडताना चौकट मात्र चुकचुकली होती
परत माघारी येणार नाही . अशी त्याने ती ओलांडली होती... त्या "ने आज च ते मोल घेऊन विकलं होत.
एक घर आज अंधारात एकटं च रडत होत..
कधीकाळी भरलेल घर, उद्या कदाचित पाडलं जाणार होत
त्याच्यासोबत एक घरपण मातीत मिळणार होत
एक घर आज अंधारात एकटेच रडत होत,, एकटेच रडत होत...
मातीत जरी मिसळलं तरी.. नवी पालवी फुटेल
आणि त्याच ठिकाणी एखादं नवं घरपण बहरेल.. माझं मन असंच काहीतरीत्याला समजावत होतं..
एक घर आज अंधारात एकटेच रडत होत..
