घे परिवर्तनाची मशाल हाती...
घे परिवर्तनाची मशाल हाती...
1 min
8
ना नावासाठी ना स्वार्थासाठी
फक्त गोरगरीबांच्या हक्कांसाठी
रात्रंदिवस कष्ट करू एकच ध्येय
गरिबांच्या चेहऱ्यावर हास्यासाठी.!!१!!
शिक्षणाची कास् धरून प्रत्येक
स्त्री, पुरुषांना साक्षरतेच्या ध्येय
पोहोचवून जिवन, परिस्थितीत
बदलकरण्याची देऊ प्रकाशमय्.!!२!!
स्त्री सृष्टीच्या हक्काची भूमिका
जातपात दुर ठेवून लढाई जिंकून
घेऊ समाज परिवर्तनांची मशाल
शेवटच्या स्त्रियांना न्याय मिळवून.!!३!!
घेऊन हाती विजयी मशाल
अद्भुत उपक्रम साजरी करू
समाज एकत्र करून द्वेष दूर
ठेवून नव ज्योत प्रज्वलित करू.!!४!!
