गेला तो काळ
गेला तो काळ
1 min
229
आई आज सुट्टी आहे मी नाही जाणार शाळेत
नको नको बाबा असे करू, गुरुजी मारेल की
बाबा बाबा आज सुट्टी आहे मी नाही जाणार शाळेत
नको नको पिंटू असे करू, गुरुजी मारेल की
रडत रडत जायचो शाळेत
टण टन टन घंटा वाजे
जन गण म्हणता म्हणता शाळा भरे
नमस्ते मास्तर म्हणत हजेरी होयी
दुपारच्या जेवणाला भाकर मिरचा
अशी आमची शाळेची मज्जा
आज सारखे पिझ्झा बर्गर नव्हते तेव्हा
मुमी पापा सर मॅडम असले नव्हते काय
शनिवार रविवार मजा मजा
कोणाचे बोर चोर कोणाचे चिंच
गेले ते दिवस राहिल्या आठवणी
