गढूळलेला बुद्धिमान प्राणी
गढूळलेला बुद्धिमान प्राणी
1 min
391
देह माणसाचा अकर्माने सजू लागलाय
माणुसकीचा दिवा आता विझू लागलाय
कैसे कर्म ज्याचे विचार क्षणभर नाही?
प्रवृत्ती दानव ज्याची आधार नाही काही
गर्व त्यास कसला कुणास ठाऊक आहे?
जन्माला जरी तेजाने तिमिरकडे का जावे?
टोळी जरी जणांची सात्विक येथे आहे
गर्दीत माणसांच्या डोकुन कुणास पाहे?
होता खुळा विश्वास खात्रीही तुझी करणे
काट्यात चालतांना का करावी जिवंत मरणे?
ओढा जरी सुगुणांचा तरी गढूळाकडे चाललाय
देह तर तोच आहे पण माणूस हरवत चाललाय ।।
