गौरव गीत
गौरव गीत
1 min
21
भारत देशा तू आमची आशा - तुझा आम्हा अभिमान
स्तुती कवने तुझी गाऊ किती - करू शतदा तुला प्रणाम!!
तू नभांगणीचा तारा- तू मंद सुगंधित वारा
तू वर्षाची जलधारा - तू लोभस मोरपिसारा
हा श्वास तुझा - विश्वास तुझा - हा प्राण तुला कुर्बान
स्तुती कवणे तुझी गाऊ किती - करु शतादा तुला प्रणाम
तू दुरितांचा कैवारी - दुखितांचा कृष्ण मुरारी
पतीतांचा पालन हरी - तू शांतीदूत अवधारी
कृषिपालक तू गुणग्राहक तू - नर रत्नांची खाण
स्तुती कवणें तुझी गाऊ किती - करू शतदा तुला प्रणाम
अभिवचन आम्ही तुज देऊ - स्वातंत्र्य अबाधित ठेऊ
समज्योत अखंडित लावू - जयगीत तुझे नित गाऊ
प्रतिकास तुझ्या जपणार सदा - जगी तुझी वाढवू शान
स्तुती कवने तुझी गाऊ किती - करू शतदा तुला प्रणाम