STORYMIRROR

Varsha Musale

Others

3  

Varsha Musale

Others

गौराईला आवाहन

गौराईला आवाहन

1 min
94

भाद्रपद महिन्यात

गणेशाचे आगमन

मनी वेध लागतात

गौराईला आवाहन.......१


घरोघरी स्वागतम

तीन दिवस माहेरी

आली माहेरवाशीण

क्षण ह्रदयी सोनेरी...........२


पाटावर मुखवटे

शिंपे सडा कुंकवाचा

करी सवाष्ण औक्षण

क्षण आला आनंदाचा........३


आनंदाची लयलूट

दारी रांगोळीचा थाट

गौराईच्या नैवेद्याला

पुरणपोळीचा घाट............४


काठपदराच्या साड्या

दागदागिन्यांचा साज

मखरात गौराईंची

दृष्ट काढते मी आज..........५


फराळाची रेलचेल

प्रसादाला खिरापत

धूपारती दीपारती

मुखी मोद विलसत...........६


खणानारळाची ओटी

पंचपक्वानांचे ताट

नाना प्रकार मिठाई

गौराईचा असे थाट...........७


गौराईच्या पुढे बाळ

सोन पावले पडती

धनधान्य समृद्धीने

सारे वंदन करती..............८


Rate this content
Log in