STORYMIRROR

Renu Sutar

Others

4  

Renu Sutar

Others

एकटेपणाशी मैत्री

एकटेपणाशी मैत्री

1 min
4


सुरुवातीला वाटले होते, शाप आहे हा एकांत,

आता उमजले मला, यातच आहे जीवनाचा सिद्धांत

गर्दीमध्ये हरवलो होतो, मुखवटे मी लेवून,

एकटेपणात भेटलो स्वतःला, सारे काही देऊन.


आता सोबतीला कुणी नाही, अन् कसलीही तक्रार,

स्वतःशीच करतो मी आता, मनाचे हे विचार.

शांत बसून ऐकतो मी, हृदयाची ती धडधड,

बाहेरच्या या जगातली, थांबली आता धडपड.


एकाकी या रात्री आता, टोचत नाहीत मुळी,

चांदण्यांच्या प्रकाशात, मन हे माझे फुली.

विखुरलेल्या स्वप्नांचाही, भार वाटत नाही जड,

एकटेपणाने दिली आता, सावरण्याची कड


कुणाची वाट पाहणे आता, मी सोडून दिले आहे,

स्वप्नांचे ते ओझे मी, मांडून ठेवले आहे.

आरशातल्या त्या प्रतिबिंबाशी, गप्पा रंगतात छान,

स्वतःमध्येच हरवण्याचे, आले आता भान


मैत्री झाली एकटेपणाशी, आता भीती नाही,

सोडून गेले जग तरी, मज खंत काही नाही.

स्वतःमध्येच हरवलो अन्, स्वतःमध्येच सापडलो,

एकटेपणाच्या शाळेत मी, जगायलाही शिकलो.


रेणु...



साहित्याला गुण द्या
लॉग इन