एकांत कधी कधी मला फार बरा वाटतो
एकांत कधी कधी मला फार बरा वाटतो
1 min
156
एकांत कधी कधी मला फार बरा वाटतो.
जेव्हा एखादा विचार मनात थेम्ब थेम्ब करून साठतो
एकांत कधी कधी मला फार बरा वाटतो.
विनाकारण झालेल्या चुकांना जेव्हा मी अगदी निरखून पाहतो.
एकांत कधी कधी मला फार बरा वाटतो.
आपल्या लोकांच्या गर्दीत जेव्हा मी अनोळखी होऊन हरवतो
एकांत कधी कधी मला फार बरा वाटतो
जेव्हा बरच बोलायचं असताना ही मी शांत राहतो
एकांत कधी कधी मला फार बरा वाटतो.
गुंतलेल्या नात्यांचे प्रश्न जेव्हा मी तासन तास सोडवत राहतो .
एकांत कधी कधी मला फार बारा वाटतो.
ह्या गोंगाटलेल्या जगाच्या समुद्रात जेव्हा मी शांततेचा तळ गाठतो .
खरंच ... एकांत कधी कधी मला फार बरा वाटतो
