STORYMIRROR

Avinash Nagargoje

Others

4  

Avinash Nagargoje

Others

एका सैनिकाचे प्रेम

एका सैनिकाचे प्रेम

1 min
256

लहानपणी मी एकदा

सहलीला गेलो होतो

आई तुझ्या कुशीत

पुन्हा मी आलो होतो


तुला वाटले बाळ हरवेल

उन्हा-तान्हात उगीच मिरवेल

घालमेल तुझ्या जीवाची

आई तुझ्याशिवाय कोण समजेल


नव्हे खोटे खरे जाहले

बोटाला तू माझ्या

जरासे रक्त पाहिले

आई तू फक्त पाहिले अन्

जखम माझे तेव्हाच राहिले


बालपण संपून आता

जरासा मी मोठा झालो होतो

भविष्याचा वेध घेत

स्वतःच आपली

वाट चालत होतो


नशिब नव्हे भविष्याने

दिलेली ती संधी होती

बालपणीच सैन्यात जाण्याची

मलाही धुंदी होती


लहानपणी मी

आईच्या कुशीत होतो

तरुणपणी मी

भारतमातेच्या कुशीत होतो


कधी हेमराज मी

बिना मुंडक्याचा

कधी हनुमनथप्पा मी

बर्फात गाडल्याचा


कधी करकरे कामटे

साळसकर तुकाराम मी

मुंबई आतंकाचा

कधी गांधी मी

अहिंसक हल्ल्याचा


कधी दाभोलकर पानसरे

कलबुर्गी गौरी लंकेश मी

आपल्याच नपुंसक

भ्याड हल्ल्याचा


निधड्या छातीनं मृत्यु

तुला समोर आलो

अन् मातृभूमी अमर

मी झालो


तरुणपणी मी एकदा

सैन्यात गेलो होतो

आई तुझ्या कुशीत

पुन्हा कधीच परत

आलो नव्हतो


Rate this content
Log in