एका भावा बहिणीची गोष्ट
एका भावा बहिणीची गोष्ट
एका भावा बहिणीची गोष्ट
जन्मताच निर्माण होते ते पवित्र नाते
जसे की कोकिळा मधुर आवाजात गाते
जिने आपल्याला जग दाखवलं ती आई
अन् तिचच दुसरं रूप म्हणजे आपली ताई
बहिण छोटी असो वा मोठी
भावाची नेहमी लाडकी असते
पण थोडे मोठे झाल्यावर टीव्हीच्या
रिमोटवरून भांडणाची दिनचर्या ठरलेलीच असते
राखीपौर्णिमेला ती जेव्हा त्याला बांधते रक्षासूत्र
तेव्हा एका नजरेने तिला लाईन मारे एक मित्र
जेव्हा ही खबर कळे तिच्या भावाला
तेव्हा तो मित्र बिचारा मुके स्वतःच्या जीवाला
बहिणीच्या प्रेम प्रकरणाला करे तो विरोध
परंतु स्वतःच्या प्रेमप्रकरणातून देई हजारो बोध
असा हा भाऊ नेहमी असे कर्तव्यदक्ष
नेहमी ठेवी आपल्या बहिणीवर कठोर लक्ष
ताईच्या लग्नाला म्हणे "तू जा इथून, मी तुझ्या पाया पडतो"
परंतु कोठेतरी एकांतात बसून मात्र ढसाढसा रडतो
जेव्हा आई नावाची वात्सल्याची उब खचून जाते
तेव्हाच ताई नावाची दुसरी आईच माया देते
भावाला इजा झाली तरी डोळ्यात अश्रु आणते
पण धीर न खचू देता भावाला नव्या उमेदीने उठवते
प्रेमभंग झाल्यावर 'तिच्यासारखे ५६ मिळतील' सांगून त्याला घडवते
पण त्याच्या मनाला वेदना झाल्या म्हणून स्वतः रडते
असा हा बंधू-भगिनीचा पवित्र संबंध
ज्याला असे अतूट, अखंड प्रेमाचा गंध
कधीच नाही येवो त्यांच्यात दुरावा
पण हा संबंध पुढच्या पिढीत रुजावा
