एक वादळ शांत झालं...
एक वादळ शांत झालं...
1 min
319
संधीच्या आकाशात
आकांक्षेचे पंख लावून
उडू पाहणार
एक वादळ आज शांत झालं...
स्पर्धेच्या या अथांग सागरात
यशस्वी डुबकी मारून
पोहू पाहणार
एक वादळ आज शांत झालं...
प्रेमाचा गोडवा शोधत
मधमाशी बनून
बागेत फुलांवर गुंजणार
एक वादळ आज शांत झालं...
अपेक्षांच्या गाभारयाला
आता कडी कोंडा लावून
इच्छांचा दिवा विझवून
एक वादळ आज शांत झालं...
