एक प्रवास
एक प्रवास
1 min
106
या प्रवासात प्रत्येक वाटेवर तुला सुखच असेल असे नाही,
तर तुला अडचणी येतील काही...
हा प्रवास असो तुझा कोणत्याही गोष्टीचा,
पण तो पूर्ण करण्याचा निश्चय असला पाहिजे तुझा मनाचा....
झाल्या गेल्या ज्या गोष्टी त्यांकडे मागे वळून बघू नको,
कारण हा प्रवास तुझ्या एकट्याचा आहे लक्ष दे वाट गमावू नको....
प्रवास असो जीवनाचा वा ध्येयाकडे पोहोचण्याचा,
जर तुझ्यामध्ये आत्मविश्वास असेल ना तर शेवटी झेंडा फडकणार फक्त विजेतेचा........
