दिवा
दिवा
एक दिवा
प्रगत विद्यार्थी करण्याचा
संकल्प घेवून
विद्यार्थी सर्वांगीण विकासाचा
एक दिवा
स्वच्छ घर, विद्यालय व गाव
उधळूनी देवू रोगराई
आरोग्य नांदत राहो
एक दिवा
समाजातील वाडवडीलांची सुश्रृषा
चिमुकल्यांना भरपूर प्रेम
गरजूंच्या पूर्ण करु अपेक्षा
एक दिवा
अनमोल भेट कन्यारत्न
वंशाचा दिवा तीच
तिच्याविना कशी वाढेल वंशावळ
एक दिवा
रोपटे, वृक्ष व वेलींसाठी
हिरवा असेल निसर्ग
तरच पर्यावरणस्नेह गाठी
एक दिवा
मानवतेचा व आपुलकी
सर्व धर्माहून ही श्रेष्ठ
माणसातली माणूसकी
एक दिवा
जादूई विज्ञान व तंत्रज्ञान
अंगठ्याला ही काम दिले
किती अनमोल तो किपॅड
एक दिवा
प्रिय सोशल नेटवर्किंग ला
फेसबुक, ट्विटर व व्हॉट्सअप सारख्या
स्वतंत्र अभिव्यक्त विचारपिठाला
एक दिवा
माझ्या प्रिय मित्रांसाठी
वेळात ला वेळ देवून
माझ्या भावना जपण्यासाठी
सर्व दिव्यांची रास लावून
आशा करु नित्य वेळी
मग पाहा तू "शफी"
होईल प्रत्येक दिवस दिवाळी
