धारा
धारा
1 min
59
धारा धारांनु जमून
या गं माझ्या रानामंदी,
लई दिसाची तान्हेली
माय माउली जननी.
किती किती सांगु नड
तुझी माझ्या या जीवाला,
नकु हाकलुरं वाऱ्या
काळ्याशार ढगाऱ्याला.
नाही तुझ्याशिवी कुणी
कुनब्याच्या या जीवाला,
पाठशीवनीचा खेळ
नगं आंवदाच्या सालाला.
नंदी बैलाची ती जोड
होता पोळ्यालारं मान,
तुझ्या दुष्काळानं राजा
झाली विधवा दावन.
जरा बरस जोमानं
नको करु बुर बुर,
वाट पाहु किती तुझी
उभा डोळ्यामंदी पुर
कुना दाखवु मी तोंड
तुझ्याईन माझ्या राजा,
लेकी-पोरीचा मी बाप
नको बगु अशी मजा.