देशभक्ती
देशभक्ती
1 min
306
देशभक्ती कशी असावी
केवळ बोलण्यापुरती न राहावी..
तर प्रत्यक्ष कृतीत ही ती उतरावी
देशभक्ती ही अशी असावी..१..
जाती - पातीचे बंधने तोडून हो
देशभक्ती प्रत्येकाने मनात जपावी
सर्व भेद विसरून माणुसकी प्रकटावी
देशभक्ती ही अशी असावी..२..
शहिदांचे स्मरण करणारी अन्
शेतकरी बापाची जाण असावी..
पाहुनी ही संस्कृती,परकियही लाजावी
देशभक्ती ही अशी असावी..३..
आपापसात मतभेद नसावी
स्वातंत्र्याचा अर्थ कधी न विसरावी..
बाह्य शत्रूंचे आक्रमण होता एकजूट व्हावी
देशभक्ती ही अशी असावी..४..
भारत माझा देश आहे
ही प्रतिज्ञा आता सत्यात उतरावी
स्वर्गमय इथली भूमी बनावी..
देशभक्ती ही अशी असावी...५..
