STORYMIRROR

imtiaz tamboli

Others

3  

imtiaz tamboli

Others

दातृत्व

दातृत्व

1 min
148

 रस्तेशाही साठी कडेचे

 कित्येक वृक्ष आम्ही तोडले

त्या झाडांवरचे निष्पाप घरटे

 आमच्याच हातांनी मोडले

 मुक्तहस्ते उधळण करताना

नसतो कसलाच भेदभाव

 सगळं देतो साऱ्यांसाठी 

दातृत्व एवढंच त्याचं नाव

फक्त पर्यावरण दिवस म्हणून बोलबाला

इतर वेळी मात्र माणूस नामानिराळा

एवढं मात्र खरं आहे

आमच्या मूलभूत गरजांचा तोच रखवाला

मात्र आम्ही आधुनिकतेच्या शृंगारासाठी 

निसर्गाच्या माथी मारतोय काठी

 कर्माचे फळ भोगतोय

 सिलेंडर घेऊन फिरतोय पाठी

 नियती देते प्रत्येकाला संधी सुधारण्याची

 मात्र इच्छा असावी लागते

परिस्थितीतून काहीतरी शिकण्याची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from imtiaz tamboli