चंद्र आज एकला नभी उगवला । रात
चंद्र आज एकला नभी उगवला । रात
1 min
6
चंद्र आज एकला नभी उगवला । रात पुनवेची मधूर भासला ।।
मेघांचा गालीचा आज नाहीं दिसला । शितल वारा अंगी झोंबू लागला ।।
उलटून गेली रात्र मध्यावरती । लुक लुकणारे तारे आतां दिसती ।।
पेटल्या गगनीं असंख्य फुलवाती । तीव्र-मंद प्रकाशानें त्या चमकती ।।
त्या असंख्यात चंद्रमा एकची सापडे । जो लोभसवाणा म्हणूनी सर्वा आवडे ।।