चलनी नोटेस...
चलनी नोटेस...
1 min
381
सये तुझ्याविण चालत नाही संसाराचे गाडे
तू नसताना आमुचे सारे काम आज हे अडे
पाच दहा ते दोनहजारी, ल्याली सारी रूपे
कधी शंभरी सोबत घेऊन काम करी तू पुरे
वजन ठेवता कामावर तू, पाय त्यास हो फुटे,
वजन वाढता अवजड होते, आम्हा उगीच वाटे
हात बदलशी सारखेच तू, शांत कधी ना बसे,
नसता जवळी कधी कुणाच्या, त्याचे होई हसे
येई सत्ता, थोडी मत्ता, साथ तुझी जर असे
झिंग तुझी जर जादा होता, विवेके गेला दिसे
नतमस्तक मी होतो सखये, बघुनी लीला साऱ्या
या जगतावर तुझीच चाले, एकछत्री ही माया
