चला पोलीस समजुन घेऊ
चला पोलीस समजुन घेऊ
"खरचं आहेस कारे तु देव,
अडचणीत तूच तर दिसतो एकमेव!!
म्हणून, चला पोलीस समजून घेऊ ,
त्यांच्या वेदनेच्या मुळाशी जाऊ!!१!!
जनतेसाठी जमेल तेवढं करतो,
कर्तव्यासाठी तो जगतो मरतो!!
गरिबांना आधाराचा हात देतो,
त्यांच्या सुख दुःखात न्हाऊन घेतो!!
म्हणुन,चला पोलीस समजुन घेऊ,
त्यांच्या वेदनेचया मुळाशी जाऊ!!२!!
नसतो कुठला त्यांना सण,
जरी असते त्यास प्रेमळ मन!!
खुश राही लोकांच्या सुखामध्ये,
शब्दाने तक्रार नसे त्यांच्या मुखामध्ये!!
म्हणुन, चला पोलीस समजुन घेऊ,
त्यांच्या वेदनेचया मुळाशी जाऊ!!३!!
असे त्यासही परिवाराची आस,
परी ड्युटी त्याचा मुख्य श्वास!!
भक्तासाठी पंढरीचा विठ्ठल जसा,
कर्तवयवर भासे आम्हा तु तसा!!
म्हणुन,चला पोलीस समजुन घेऊ,
त्यांच्या वेदनेच्या मुळाशी जाऊ !!४!!
होती 26/11 ची आम्हासाठी काळरात्र,
तु लढलास शेवटच्या श्वासापर्यंत मात्र!!
दाखवलेस त्या रात्री तु असामान्य धाडस,
म्हणून सुखरूप राहिले प्रत्येक घरातील हरणी पाडस!!५!!
म्हणुन चला पोलीस समजुन घेऊ!!
हृदयापासुन त्यांचे आभार मानू!!
चला पोलीस समजुन घेऊ!!
