चिकाटी
चिकाटी
1 min
383
प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे
उंटावरती शेळ्या हाकोनी न मिळती फळे
प्रयत्नांच्या जोडीला असावी चिकाटी
मी म्हणोन येईल सवे यशाची अनुभूती
सुबक जाळे कोळ्याचे परिश्रमाचे फलित असे
कष्टाच्या जाळ्यामध्ये सावज अलगद फसे
निसर्गाची किमया भासे मधमाशीचे पोळे
वसती परी तयात तिच्या कष्टाची पाऊले
पक्षी जमवितो काड्या घरट्यासाठी
ऊन वाऱ्याची नसे त्यास आडकाठी
मग्न होई मूर्तिकार मूर्ती घडवाया
विसरे भान तो मूर्ती पूर्ण कराया
प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे
अविरत कष्टाने चाखू यशाची फळे
