बोटाच्या करामती
बोटाच्या करामती
हे बोट आहे करामती
त्याच्यातून निघतात वेगवेगळे अर्थ
स्तंभित होते समयी मति
जेव्हा साकारतात याद्वारे निजी स्वार्थ ...१...
संसारात असते याला महत्व
इकडॆ तिकडे घातले तर वाढतात वाद
काहीप्रसंगी गमावले जाते सत्व
चांगले ऋणानुबंध यामुळे होतात बाद ...२....
काही बायका करतात जादू
आपल्या कुटुंबियांना नाचावतात बोटावर
नवरे बनतात अनिच्छेने साधू
संसाराच्या भल्यासाठी नियंत्रण ठेवी रागावर ...३....
बोट निर्देशित करते बहुमत
पण ते अनुकुल करण्यासाठी होते धावपळ
दिले सर्वांनी आपल्याला मत
तर चाखायला मिळते राजसत्तेचे गोड फळ ...४...
हे बोट दाखविते सहमती
पण आपल्या सोयीने घ्यावा त्याचा अंदाज
वातावरण बघून करा युती
नाहीतर गमावून बसाल हातचे कामकाज ...५...
बोटात आहेत नाना कला
त्यामुळे द्यावा त्याला अगदी मनापासून मान
जर कवडीमोल समजाल त्याला
तर खात्रीने पाश्चातापाने धरावे लागतील कान ...६....
