बोल अनुभवाचे ( माझे बाबा )
बोल अनुभवाचे ( माझे बाबा )
जीवनाच्या खडतर प्रवासातून जातानावेड्या वाकड्या वाटांवर अडखळे पुन्हा पुन्हा.....
कधीतरी घेऊ विसावा एका वळणावर अनेकदा वाटून गेले काय केला मी असा गुन्हा.....
स्वप्नांचे डोंगर रचले होते आयुष्यात होत राहिली उगीच त्यामागे धावपळ.....
कष्टांचे ओझे राहिलो वाहत जीवनी सुखाच्या हसऱ्या क्षणांसाठीची ती तळमळ.....
आशा अपेक्षा खूप होत्या जपल्या उरीवाटे मिळावी प्रेमाची सावली कधी क्षणभर.....
आनंदाची हिरवळ पसरूनी जावी अशीच आणि घेऊ विसावा मनसोक्त या वळणावर.....
बालपणीनंतर किशोरावस्था आणि त्यानंतर वार्धक्याची दिसणारी समोर स्पष्ट वाट.....
या सगळ्यातून जातानाचा तो मार्ग अडखळत वाटले कधीतरी येईल सुखाची रे लाट.....
तडजोड,संयम आणि कर्तव्यांनी सदा झुकलेला तो खांदा हलका होईल कधीतरी.....
उर फुलून जाईल आनंदाने अपेक्षा पूर्तीच्या घेईन विसावा त्या एका वळणावर तरी.....
सर्वस्व अर्पण केले उभारण्यासाठी संसार निव्वळ चिंता आणि कष्टांची धरून कास.....
दुःख सारे संपल्यावर घेईन मी विसावात्या सुखाच्या प्रकाशात हरवून जाईल सगळा त्रास.....
