STORYMIRROR

Vaijayanti Pate

Others

4  

Vaijayanti Pate

Others

बळीराजा अन् दुष्काळ

बळीराजा अन् दुष्काळ

1 min
383

*स्पर्धेसाठी 


कधी ओला दुष्काळ 

तर कोरडा कधी

जीव जातोय सार्यांचा

खाया भाकर नाही साधी।।


आली होती सुगी

सारे झाले समाधानी

पीक डोले शेतामध्ये 

वाटे झाली आबादानी।। 


पण येता देवाजीच्या मना

त्याने मांडियला खेळ 

धो-धो पाऊस सरींनी 

सारा मोडला तो मेळ।। 


गेले सारे वाहूनिया

हाती नाही गं उरले 

आता फक्त आठवणी 

कसे दिवस ते सरले।। 


पण कांही ठिकाणी तर

नाही पाऊसच आला

दाणे शेतात पेरलेले

काऊ चिऊ घेऊन गेला।। 


एकूणच झाले काय

बळीराजाचे सारे हाल

मृग वर्षला जिथे आणि 

नाही तेथे तो बेहाल।। 


मदत हवी बळीराजाला

आपणां सर्वांच्या कडून

सरकार देईल कधीतरी

तोवर आधार। देऊन।। 


दुष्काळाच्या समस्येवर

करु सारे मिळून मात

देऊ साथ एकमेका

घेऊन हातामध्ये हात।। 



Rate this content
Log in