भावाबहिणीचे प्रेम
भावाबहिणीचे प्रेम

1 min

219
वडिलांचे वात्सल्याचे
पतीचे प्रेमाचे
नाते भावाबहिणीचे
या सर्वांहून वेगळे
खेळ, खोड्या, मस्ती, कोडी
पडणे, भांडणे, लाडीगोडी
मार्गदर्शक पाठीराखा
भाऊराया वाढवी गोडी
रेशमी बंध प्रेमाचे
आर्त भावाचे बहिणीसाठी
मनापासून आळविता
कृष्ण धावे द्रौपदीसाठी
आदर्श बहीण भाऊ जगी
चंद्र आणि धरती
एकमेकांची सुखदुःखे
दूर असून जाणवती
धरती सूर्याच्या संसारात
चंद्र दडे दूर आकाशात
चंदादादाची धरतीला साथ
रात्री सूर्याच्या विरहात
सुखी पूर्ण चंद्राच्या दर्शने
धरतीला आनंदे भरते
दडता अवसेला दुःखी चंद्र
धरतीचा ऊर दाटे