भाऊबीज (मधुसिंधू काव्यरचना)
भाऊबीज (मधुसिंधू काव्यरचना)
1 min
462
सण प्रथेचा
बहीण भावाचा
सण मांगल्याचा
भाऊबीजेचा...१
नाते ते दृढ...
रेशीम बंधन
प्रफुल्लित मन
प्रेमे आरूढ....२
पवित्र सण...
औक्षण भावास
दिवस हा खास
सुखाचे क्षण....३
बंध नात्याचा...
अनमोल क्षण
बहीण रक्षण
भाव भावाचा....४
मागते देवा...
आयुष्य उदंड
बंधन अखंड
वात्सल्य ठेवा....५
भावास देऊ...
गोडाचा पदार्थ
भावना नि:स्वार्थ
सदैव ठेवू ....६
