बदललो
बदललो
1 min
255
तू बदलली ना मी बदललो आहे
मी तुझ्या सारखा झालो आहे....
एका वळणावर येवून सार काही विसरून
मी तुझ्या पासून दूर झालो आहे....
थोड खोट बोलून मनाला माझ्या ठगुण
मी माझ्या मनाशी खेळलो आहे....
प्रेम करून तू माझ्या आयुष्यात विष भरून
तुझ्या खोटारडेपणाला मी धडकलो आहे....
प्रेमात अश्रु पिऊन तुझ्यासाठी दुख भोगून
मी तुझ्या दुखात अडकलो आहे.......
होती प्रेमाची तहान राहिलो तुझ्यासाठी गहान
कळलं ना मी तुझ्या आठवणींना मुकलो आहे.....
तुझी आठवण मनात केली साठवण
तुझ प्रेम हरलो मी आज वाट चुकलो आहे.....
