STORYMIRROR

Sanjay Ronghe

Others

3  

Sanjay Ronghe

Others

बापूंची ती खादी

बापूंची ती खादी

1 min
360

यादच नाही राहात 

करु कशाची यादी ।

देशासाठी लढले किती

असतो त्याच नादी ।


फाटका घालतो सदरा

परी बापूंची ती खादी ।

पाळतो अहिंसेचे व्रत

सांगून गेली दादी ।


रघुपतीचे गातो भजन

झोपायच्या मी आधी ।

भुमीवर टाकतो अंग

कुठे कशाची गादी ।


याद करतो बापूंना

 राहणी माझी साधी ।

भारतमातेचा पुत्र मी

नमन करतो आधी ।


Rate this content
Log in