बाप्पा
बाप्पा
आरे बाप्पा हा कोरोना शाप म्हणावं की वरदान हेच कळत नाही,
कारण भारत स्वतंत्र नंतर हरवलेली एकता आज दिसते काही.
बाप्पा ही हाक ऐकावी तुझ्या लेकरांची,
काया अथांग आहे तुझ्या या कार्याची.
वाचवावे तू तुझ्या या भक्तांना,
नेहमी हसत करतात तुझी ते प्रार्थना.
काय होते नी काय झाले,
बघता बघता हे प्राण जीव सोडू लागले.
तुझं दुसरं रूप या डॉक्टरांमध्ये दिसू लागले,
तुझ्या या अथांग शक्तीची गरज भासू लागले.
शब्द नव्हे अखंड वाक्य कमी पडू लागले,
स्वप्नांत देखील हे कोरोनाच येऊ लागले.
देवा तुझं तिसर रूप या पोलिसांमध्ये दिसतो,
स्वतः धीटपणे उन्हात थांबून या जनतेला घरी सुरक्षित बसण्यासाठी खूप प्रयेत्न करतो.
महामारी च्या या काळात तू खूप दिली आहे शक्ती,
घरी बसून रोज लोक करत आहेत तुझी भक्ती.
आमच्या बहिणींना सांभाळून घे देवा,
नर्स बहिणी करत आहेत या जनतेची २४ तास सेवा.
शेतकरी पोट भरण्यासाठी जात आहे शेतावर,
महामारी किती आली तरी तो जातो त्याच्या कामावर.
कारण रोजची रोजीरोटी असते त्याची शेतावर,
पोरांचं नी या जगाचं पोट पाळतो तो त्याच्या हिमतीवर.
कोरोनाच्या दिवसांत देखील सैनिक सीमेवर आहे लढत,
शत्रूचे घाव शोषून देखील आहे तो तिरंगा फडकवत.
बाप्पा तू आम्हाला सर्व पोलीस, डॉक्टर, नर्स, शेतकरी, सैनिक यांमध्ये दिसत आहे,
मस्जिद, मंदिर, चर्च आज संपूर्ण एकत्र दिसत आहे. -
