STORYMIRROR

Amarendra Kondawar

Others

3  

Amarendra Kondawar

Others

​"बाप नावाचा माणूस"..!

​"बाप नावाचा माणूस"..!

1 min
198

जन्मदाता बाप कधीच कुणाला 

दिसत नसतो, 

जन्म देऊन तो कर्तव्यात 

मग्न असतो... 


कठोर परिश्रम त्याचे 

कुणाला कळत नसते,

दिवसभर घराबाहेर 

घाम गाळत असते... 


मुला मुलीच्या भविष्यात 

आपलं जगणं विसरतो, 

घरी कधीच तो रडताना 

दिसत नसतो... 


आयुष्याचा तो 

आधार पुरुष असतो, 

मनानी मात्र तो पुरता 

खचलेला असतो... 


उतारवयात काठी 

मुलंच होईल वाटतात, 

शिकून सवरून मुलं 

परदेशात वसलेली असतात... 


आयुष्याच्या खस्ता खाऊन 

म्हातारपण येत, 

मरताना पाणी पाजायला 

कुणीच तेव्हा नसत... 


बाप म्हणून जगला 

बाप म्हणून मेला, 

फोटोवरचा हार बघून 

स्वर्गातच तो रडला..! 


साहित्याला गुण द्या
लॉग इन