"आई तुज विन भिकारी"..!
"आई तुज विन भिकारी"..!
1 min
156
थकली माय माऊली
वाटते वाईट मनात,
परत ती व्हावी तरुण
येते प्रत्येक क्षणात...
बदलला चेहरा मोहरा
माया बदलली नाही,
स्पर्शही तिचा तोच
डोळ्यात तिच्या पाही...
चाल तिची मंद
अंग करते थरथर,
काळजी तिला असते
सर्वांचा करते विचार...
वेळ जातो तिचा
मोबाईल टीव्ही बघत,
नातवा पणतु सह
असते ती गोकुळात...
आयुष्य भर खाल्या खस्ता
शेवट तुझा आनंदात,
जगावे तू मनसोक्त
नको कुणाच्या काळजीत...
मायेचा हात तुझा
असू दे मस्तकावर,
स्पर्श हा असाच
करीत रहा सर्वांवर..!
