बालपण
बालपण
1 min
655
खरंच लहानपण
छान असतं,
जीवनाचं वैभव असतं...
मनाच मांगल्य असतं...
सवंगडयाचं काहूर असतं,
खरंच बालपण
किती छान असतं.
हारण्या जिंकण्याचं,
टेंशन नसतं...
मरण्याचं तर
भ्यावचं नसतं....
खरंच लहानपण...
किती सुंदर असतं..,
जे आवडतं तेच आवडतं,
जे भावतं तेच रूजतं,
जे खातं, ते पचवतंय...
खरचं बालपण
किती खास असतं....
