बाळा तुझी आठवण येईल...
बाळा तुझी आठवण येईल...
1 min
497
घरामध्ये वावरताना तुझ्या,
लुडबुडीचि जाणीव होईल.
डोळ्यांच्या एका कोपऱ्यात,
अश्रू साठवून जाईल.।।१।।
आठवतील तुझे लहानपणीचे,
बोबडे तोडके-मोडके बोल.
तेव्हा कोरड्या माझ्या घश्यातून,
फुटणार नाहीत स्वर.।।२।।
जेवायला बसल्यावर बाळा,
तुझी जागा रिकामी राहील.
ती जागा बघून बाळा,
आमचं मन खूप भरून येईल.।।३।।
माझं नाव बाळा आता,
सोबत तुझ्या दिसणार नाही.
पण तुझ्या वेड्या बापाची,
माया कधी कमी होणार नाही.।।४।।
एकटीच्या तुझ्या जीवनात,
सुखी सुरवात नव्याने कर.
आई बाबा अवैजि बाळा तु,
सासू सासऱ्यांवर प्रेम कर.।।५।।
भावा बरोबरची भांडणे विसर,
नणंद-जावे वर प्रेम कर.
तुझ्या पतीचा आदर कर,
तुझा संसार ऱाजा-राणीचा कर.।।६।।
