बाबा
बाबा
बाबा, तुम्ही कधीही बोट धरून
चालायला शिकवलं नाही
पण तुमच्या पावलांची दृढता नि स्थिरता
सतत देत राहिली माझ्या पावलांना
वेड्या-वाकड्या वाटावरुन
सरळ चालण्याची क्षमता
बाबा, तुम्ही कधीही दिले नाही
चरित्रावर भाषण
पण तुमच्या व्यक्तित्वानेच
हळू-हळू मिळत राहिली
बरे-वाईट ओळखण्याची शिकवण
आठवत नाही कधीही तुम्ही
रागे भरलात मला
किंवा कधीही पटवून सांगितले
वेळेच्या महत्वाला
पण तुमच्या अनुशासित दिनचर्येने
एक आदर्श साचा तयार करुन
एका सभ्य, शिस्त मूर्तित
घडविले मला
बाबा, तुम्हीच जाणले, समजले
शब्द खोटे असू शकतात
पण आचरण नाही
म्हणूनच तुम्ही शब्दांच्या भोवऱ्यात नाही अड़कला
आयुष्याचा धड़ा कर्तृत्वाने शिकविला
उन्हाला कधीही घाबरले नाही मी
जाणत होते वटवृक्षासारखे
प्रत्येक वळणावर, सावली होऊन
खंबीरपणे पाठीशी उभे असाल तुम्ही
बाबा, तुम्ही कधीही मला टोकले नाही
धाकात ठेवले नाही
पण ही तुमचीच मुळे आहे माझ्यातही
की आज भूमिवर दृढतेनी उभी आहे मीही
एक सशक्त वटवृक्ष होऊन
वृक्ष बाळास सांगत नाही कोण व्हावे
त्यास ठाऊक असते, त्याचे बीज कोठेही पड़ो,
ते होणार त्या वृक्षाचेच प्रतिरूप
बाबा, तुम्हीही आश्वस्त होता, जाणत होता
माझ्यातल्या स्वतःच्या बीजाला
त्याच विश्वासाच्या ठोस भूमिवर
उभी आहे आज मीही आपल्या संपूर्ण अस्तित्वासह...
