बाबा हवे आहात तुम्ही मला
बाबा हवे आहात तुम्ही मला
बाबा वो बाबा हवे आहात तुम्ही मला
माझ्या जीवनाच्या प्रत्येक वळणावर
मला हात धरून पुढे नेण्यासाठी,
हो हवे आहात तुम्ही मला जीवनाच्या
प्रत्येक क्षणात मला साथ देण्यासाठी,
हवे आहात तुम्ही मला
मी मनात साठवून ठेवते त्या
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी.
कसं सांगू हो बाबा खूप सोसलं
हो तुमच्या ह्या एवढ्याश्या चिमुरडीने ,
आई _बाबा मी इवल्याशा पावलांनी
आले तुमच्या अंगणी आई आणि
तुम्ही मला आजच्या क्षणापर्यंत खूप दिले
प्रेम जिव्हाळा भरभरून केली माया
पण हे सर्व आजच्या क्षणापर्यंतच का पुढे का नाही.
जन्म तुम्ही दोघांनीही दिले ना मला रक्त
तुम्हा दोघांचेही आहे माझ्यात
मग वाढविले ही पाहिजे ना दोघांनीही
मिळून मला का मी राहू फक्त आईकडे
किंवा का राहू फक्त बाबांकडे दोघांचेही
प्रेम मिळवण्याचा हक्क ही नाही का मला,
बाबा हवे आहात तुम्ही मला
जेव्हा शाळेतली मुलं मला पाहून हसतात ना
तेव्हा त्यांना उत्तर देण्यासाठी
बाबा माझी शाळा बदलली
गाव, मैत्रिणी, वातावरण सर्वच बदललं हो बाबा.
एकटी पडले मी खूप गोंधळली मी आईला चिडायचे,
अबोला धरायचे रडायचे ही कित्येकदा पण जाणवू दिली नाही
तुमची कमी कधी तिने मला,
बरं बाबा_बाबा शाळेच्या पायऱ्या ना खूप उंच आहेत
हो पाय दुखतात हो माझे
हवे आहात तुम्ही मला त्या पायऱ्या तुमचा हात धरून
वर चढवण्यासाठी बाबा हवे आहात तुम्ही मला
माझ्या भाषणाचे नृत्याचे कौतुक
आज होताना पाहण्यासाठी
बाबा म्हणतात की आई कधीच खोटं बोलत नाही
पण माझी आई का हो खोटं बोलते
हे जाणून घेण्यासाठी हवे आहात तुम्ही,
कारण बाबा डोळ्यात नेहमीच बघितलं मी तिच्या पाणी
पण विचारलं तर म्हणते कशी काही नाही डोळ्यात कचरा गेला ग राणी
बाबा हवे आहात तुम्ही मला
त्या सर्वच प्रश्नांची अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी
जे लपवते हो आई नेहमी माझ्याच सुखासाठी
बाबा हवे आहात तुम्ही मला
