अथांग
अथांग
तो एकच होता...... अथांग........
पण प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या एका वेगळ्याच अथांगात होता...
बरच काही शोधत होता
बरच काही लपवत होता
बरच काही बोलत होता
बरच काही उधळत होता
बरच काही कळत होतं
बरच काही नकळत होत होतं
तो फक्त शांत होता....आतून... निपचित
पण त्याचं वरवरचं वागणं सगळ्यांना खूपचं भावत होतं
त्याचंही बरोबरच आहे म्हणा
आता खाऱ्यातून खारं कस वेगळं करणार नाही का ?
त्याला बघून प्रत्येकाला काही न काहीतरी वाटत होतंच...
पण त्यालाही काहीतरी वाटत असेल याबद्दल कुणालाच काही वाटत नव्हतं...
याच जास्त विशेष वाटत होतं
तो अथांग नक्कीच आहे पण अमर्याद नाही
हे कधीच कुणाला कळणार नाही ???
सामावून घेतो यापेक्षा सामावू देतो हे कित्ती मोठेपण त्याचं
आणि मग आपण सगळा भार त्याच्यावर टाकून म्हणणार
आता जरा हलकं वाटतंय खरंच....
आता कळतं तो इतका खोल का गेलाय...
मी म्हणलं बाबारे मग एकटा का राहतोस इतक सारंं असूनही
तो म्हणाला म्हणूनच तर नेहमी सोबत मिळत राहते
दोघेही वरवरचं हसलो मग उगाचंच
म्हणलं मला खोल जायचंय, काय काय आहे बघायचंय,
हसत म्हणाला भाजीत चवं काय उगाच येते काय ?
मी निशब्द....
मी म्हणलं तू दिवसा वेगळा असतो आणि रात्री...
म्हणाला मी फक्त असतो
दिवस काय अन रात्र काय तुमचीच होत असते...
मी विषय बदलला
म्हणलं तुझी मिठी सैल झालीय...
ती बघ पहाट येतेय
तो खूप हसला माझ्या बालिशपणावर अगदी मनापासून...
मी नकळत त्याच्या कायम उघड्या हाताच्या मिठीत विसावलो....
