अष्टाक्षरी रचनाशिर्षक -निसर्
अष्टाक्षरी रचनाशिर्षक -निसर्
1 min
254
निसर्गाशी करू मैत्री
झाड लाऊनिया दारी
गारगार सावलीने
येते मनास उभारी
सारे मिळून आपण
करू झाडांचे रक्षण
लेणं लेऊन हिरवं
होई धरतीच सोनं
झाड वेलीच्या संगती
गोड गातात पाखरे
काळजाच्या वेदनेला
नवं फुटती धुमारे
तृण भरली धरणी
सदा शोभते हिरवी
राम प्रहरी जागवी
सर्व जगतास रवी
फुल तोडता झाडास
अंतरंगी होते इजा
गंधासाठी देऊ नका
त्यास जन्माची ही सजा
टाकुनिया सारी कामे
लावा बांधावर झाडे
मानवाच्या भल्यासाठी
त्याची उघडी कवाडे
तोडू नका झाडे कोणी
सारी धरती उघडी
दुष्काळाच्या वनव्याची
डोळा लागते हो झडी
काऊचिऊ साठी बांधा
उभ्या झाडाला झोपाळा
राघू मैना संगतीने
गीत गाईल कावळा
