STORYMIRROR

SHAM GORE

Others

4  

SHAM GORE

Others

असंही एकदा घडावं...

असंही एकदा घडावं...

1 min
437

तू समोर दिसल्यावर वाटते तुलाच बघत बसावं

सगळं काम सोडून तुझ्याच आहारी जावं


वहीच्या शेवटच्या पानावर तुझंच नाव लिहावं

आणि तुझ्या जीवनाचा सर्वात मोठा भाग व्हावं


माझं संपूर्ण जीवन तुलाच अर्पण करावं

तुला सोबत घेऊन कुठेतरी दूर फिरायला जावं


तुझ्यासाठी वाटेल ते करावं

मन भरून रोज तुलाच पाहावं


जीवनाच्या प्रत्येक क्षणात तुझ्यासोबत रहावं

मग मरण जरी आले तरी तुझ्यासोबत यावं


माझं जीवन हे तुझ्यासाठी असावं

आणि प्रत्येक वेळेस मी तुझ्यासाठी मरावं


तुला प्रत्येक जन्मी आपलस करावं

सात जन्म पण तुझ्यासाठी जगावं


प्रत्येक क्षणी तू मला ओळखावं

माझं मन तुझं झालं हे तुलाही कळावं


क्षणोक्षणी मी तुझ्यासाठी झुरावं

प्रत्येक जन्मी तुझं मन माझं व्हावं


Rate this content
Log in