असे वाटते असे जगावे
असे वाटते असे जगावे
1 min
426
वाटे उठूनी प्रवासास या निघून जावे
पुरेल सोबत माझीच मजला असे जगावे
कुणी म्हणाले जीवनगाणे सुरेल व्हावे
असू दे कणसूर हरकत नाही, खरे असावे
वाट पाहते दु:ख आपुली दबा धरुनी
गळाभेट दु:खाची घेऊन पुढे निघावे
हेवा करण्याजोगे मजला नकोच काही
श्वासा इतुके नाते अपुले सहज असावे
गुरफटले जरी कोषामध्ये हरकत नाही
फुलपाखरू बनून तरीही पुन्हा उडावे
किंमत चुकवून शिकतो आपण इथेच सारे
कुणी कुणाच्या साठी केव्हा किती रडावे
