अपूर्ण
अपूर्ण
1 min
158
अपूर्णत्व काय आहे माहीत आहे का?
मला माहीत आहे...
तो एक दिवस खास आहे तुझ्यासाठी,
पण तो साजरा करण्यासाठी "ती" तुझ्या बाजूला नाही आहे, म्हणजे तो दिवस अपूर्ण आहे,
मंद झुळझुळ ऐकत नदीच्या किनारी तू शांत बसलाय,
पण त्या शांततेत "ति"च्या श्वासाचा आवाज ऐकू येत नसेल , तर ती शांतता अपूर्ण आहे,
बाहेर पावसाची थंड सर पडतेय, पण "ती" जर त्यावेळी तुला उष्मा द्यायला तुझ्या कवेत नसेल तर तो पाऊस अपूर्ण आहे,
यश तुझ्या हाताशी आहे, पण यश मिळवताना जर "ति"चा हात तुझ्या हातात नसेल तर ते यश अपूर्ण आहे,
अन
तू राजा असलास जगाचा तरी, "ती" नसेल प्रेम करायला तुझ्यावर तर तू अपूर्ण आहेस।
