अंत
अंत
1 min
696
मी जेव्हा मरून जाईन
तेव्हा मला जाळू नकोस
आयुष्यभर जळत होतो
आणखी चटके देऊ नकोस
जेव्हा माझा अंत होईल
तेव्हा मात्र रडू नकोस
माझ्या विधानाचा गंध
फुलाच्या वासात दडवू नकोस
माझ्या देहाच्या मातीला
तू नमस्कार करू नकोस
आयुष्यभर पायाखाली
तुडवलं शेवटी पाया पडू नकोस .
