Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chaitanya Kulkarni

Others

3  

Chaitanya Kulkarni

Others

अकथित

अकथित

1 min
142


डोळ्यात भाव दाटून येतो,

शब्द मात्र कंठातच राहतो।


एक भटका जीव मी, ना कुठे स्थिरावला,

तू भेटता जीवनाला अर्थ नवा मिळाला,

तुझ्याच सोबत भविष्याची स्वप्ने मी पाहतो ।। १ ।।


खुळे हे मन माझे, बोलण्यास असमर्थ,

काय वाटेल तुजला, चिंता करी व्यर्थ,

तुला आठवून मी स्वतःशीच बोलतो ।। २ ।।


कित्येकदा वाटे, अर्थ ह्यास काही नाही,

सत्य जाणण्याचा हक्क आहे तुलाही,

शब्दावाटे आज माझ्या भावना सांगतो ।। ३ ।।


तू नसता श्वास माझा व्याकुळसा होतो,

तू नसता जीव माझा घायाळसा होतो,

तू नसता प्राण माझा एकेकटा होतो ।। ४ ।।


सत्य सांगतो, जीव माझा तुझ्यातच गुंतला,

प्रतिक्षेचा कठीण काळ हा अखेर सरला,

तुझ्या प्रीतीच्या छायेसाठी मी सागर तरतो ।। ५ ।।


तुझ्या मनाचे हितगुज सारे आज सांग तू मला,

डोळ्यात तुझ्या प्रेमाचा भाव मी स्वतः पाहिला,

उत्तराच्या प्रतीक्षेत मी जगण्याचे धागे विणतो ।। ६ ।।


डोळ्यात भाव दाटून येतो,

शब्द मात्र कंठातच राहतो ।।


Rate this content
Log in