STORYMIRROR

Sangita Jaiswal

Others

4  

Sangita Jaiswal

Others

अजून किती

अजून किती

2 mins
485

तुमच्या खांद्याला खांदा दिला, तुमच्या अहंकाराला मात दिली..

पैसा कमावला , तुम्हाला जन्म भराची साथ दिली तरी..

अजून किती स्वताला proove करणं बाकी आहे..


पाणी आण चहा दे हे कालचक्र अविरत चालू आहे

तुम्ही काय करता दिवस भर , हे च तर तुमचं काम असे प्रश्न विचारणं अजून चालूच आहे सांगा..

अजून किती स्वताला proove करणं बाकी आहे..


हे घालू नका , जास्त बोलू नका हि बंधन अजून तशीच आहे

मुलीच्या जातीला हे शोभत नाही हा टोमणा अजून चालू आहे

अजून किती स्वताला proove करणं बाकी आहे..


तुमच्या पेक्षा जास्त पैसा कमावला तरी खुपतं , तो कमावलाच नाही तरी दुखत अश्या या पुरुषप्रधान संस्कृतीत कोण कसं मोकळा श्वास घेऊ शकत आहे उघडा तोंड आणि सांगा 

अजून किती स्वताला proove करणं बाकी आहे..


पतलं नाही कधी तर बोलू दिलं जातं नाही , मत मांडू दीलं जात नाही फक्त गप्प कसं कोण जगेल , या घुसमटीतून बाहेर कसं कोण पडेल बोला ...

 अजून किती स्वताला proove करणं बाकी आहे..


आणि आता जरा safety बद्दल कुठे आहोत आम्ही safe कुठे आहोत आम्ही safe 

चालतांना बेवड्यांची भीती , वळताना नाक्या वरच्या पोरांची भिती ओढणी अजून किती चापून चूपून घ्यावी आणि किती .. ही भीती अजून आहेच आहे ..

अजून किती स्वताला proove करणं बाकी आहे..


Lipstick जरा जास्त झाली की faltu चा tag लागतो 

Short कपडे घातली की म्हतारया पासून तरुणांन पर्यंत एक एक जण वळून बघतो..ते नक्की काय विचार करत असतील हाच विचार चालू आहे..

अजून किती स्वताला proove करणं बाकी आहे..


खरंच अजून खूप सारं आहे पण कळत नाही बोलून सगळं कित पत कळेल शेवटी सारं धुळीस जाऊन मिळेल मुलगी वाचवा मुलगी शिकवा नुसत्या म्हणन्याच्या गोष्टी ओ हे असं वावगं जगण्या पेक्षा तो जन्म च नको जिथे आम्हाला रोज एकच प्रश्न असेल ..

अजून किती स्वत:ला proove करणं बाकी आहे..


Rate this content
Log in

More marathi poem from Sangita Jaiswal