STORYMIRROR

Neha Upadhyay

Others

3  

Neha Upadhyay

Others

'आयुष्य'

'आयुष्य'

1 min
735

आयुष्यभर सोबत असून 

जवळ कधी बसत नाही 

एकाच घरात राहून 

एकमेकास दिसत नाही 

हरवला तो आपसातला 

जिव्हाळ्याचा संवाद 

एकमेकास दोष देत 

नित्य चाले वाद विवाद 

धाव धाव धावतो आहे 

दिशा मात्र कळत नाही 

हृदयाचे पाऊल कधी 

हृदयाकडे वळत नाही 

इतकं जगून झालं 

पण जगायला वेळ नाही 

जागतो आहोत कशासाठी 

काहीच कसला मेळ नाही 

क्षण एक येईल असा 

घेऊन जाईल हा श्वास 

अर्ध्यावरच थांबलेला 

असेल जीवन प्रवास 

अजूनही वेळ आहे 

थोडं तरी जगून घ्या 

सुंदर अश्या जगण्याला 

डोळे भरून बघून घ्या


Rate this content
Log in

More marathi poem from Neha Upadhyay