आयुष्य
आयुष्य
1 min
172
आयुष्याच्या ह्या..
वळणावर जरा जरा..!
थोडा विसावलो...
कोरोना च्या संकरात
क्षणभर घरात जरा जरा...!
स्वप्न होते किती किती
झालेत किरी मिरी हे
ओंजळीत पकळण्या
थांबलो मी जरा जरा...!
आयुष्याच्या ह्या..
मागे वळून पाहताना
मुकलो कातर वेळा..
मनाच्या हाकेला जरा जरा
आयुष्याच्या ह्या..
वळणावरआठवतात
कॉलेज मधल्या...
प्रेम झरा त्या जरा जरा..!
आयुष्याच्या ह्या...
श्रावण सरी पडताना
ओल्या चिंब थंडीची
चाहूल मज हो जरा जरा.!
आयुष्याच्या ह्या...
आठवणीतील संध्येचे
प्रेम इंद्रधनू चे रंग...
आकाशात रंगले जरा जरा.!
आयुष्याच्या ह्या...
वळणावर शब्द..
धावले सुचले भराभरा
लिहिण्या लागलो जराजरा.
